भजनी मालिका
← भजनांकडे परत

विटेवरी उभा नीट देखिलागे माये । निवाली कांती हरपला देहभाव

vitevari ubha nit dekhilage maye | nivali kanti harapala dehabhav

रचनाकार: संत सेना · अभंग
विटेवरी उभा नीट देखिलागे माये । निवाली कांती हरपला देहभाव ॥१॥ तें रूप पाहतां मन माझें वेधले । नुठेचि कांहीं केलें तेथुनि गे माये ॥२॥ अवघे अवघियाचा विसर पडियेला । पाहतां चरणाला श्रीविठोबाच्या॥३॥ सेना म्हणे चला जाऊं पंढरीसी। जिवलग विठ्ठलासी भेटावया ॥४॥