भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्वासी ते ऐकतां कानीं । धरिती मनीं आदरें

vishvasi te aikatan kanin | dhariti manin adaren

रचनाकार: संत निळोबा · अभंग
विश्वासी ते ऐकतां कानीं । धरिती मनीं आदरें ॥१॥ पूर्वार्जितें उत्तमें होतीं । आली सत्संगती भेटो ते ॥२॥ सुखें सुखें वाढतें झालें । केलिया विठठलें कृपा मग ॥३॥ निळा म्हणे निजात्मसुखा । पावलें एका क्षणमात्रें ॥४॥