भजनी मालिका
← भजनांकडे परत

विंचु नांगीं विष धरी । खोसडेवरी मृत्यु त्या

vinchu nangin vish dhari | khosadevari mrutyu tya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
विंचु नांगीं विष धरी । खोसडेवरी मृत्यु त्या ॥१॥ जैसें कर्म तैसें फळ । हें तों अढळ न चुकेचि ॥२॥ चोयाकरिता तुटती हात । पावति घात जीवितेसी ॥३॥ निळा म्हणे सिनळी करिता । झुरती उभयता नाककान ॥४॥