भजनी मालिका
← भजनांकडे परत

विनंती माझी परिसावी । कृपा दीनावार करावी

vinanti majhi parisavi | krupa dinavar karavi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विनंती माझी परिसावी । कृपा दीनावार करावी ॥१॥ नित्य नवा नामघोष । आठव द्यावा सावकाश ॥२॥ नामावांचुनी कांही दुजें । मना आणिक नमो माझें ॥३॥ एका विनंति करी । जनार्दन कृपा करी ॥४॥