भजनी मालिका
← भजनांकडे परत

विकल्प वासना समूळ दे टाकुनी । मग तुज भजनी सुख बापा

vikalpa vasana samul de takuni | mag tuj bhajani sukh bapa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विकल्प वासना समूळ दे टाकुनी । मग तुज भजनी सुख बापा ॥१॥ आशापाश मोह सांडी तूं निराळा । भजन तें गोपाळा प्रिय वाटे ॥२॥ भेद अभेददाचें मूळ आधीं खंडी । भजन तें तोंडीं मग गोड ॥३॥ एका जनार्दनीं शुद्ध हे वासना । तैं नारायणा प्रिय भक्ति ॥४॥