भजनी मालिका
← भजनांकडे परत

विचारीं पां धडफुडें । देह तंव केवळ जडमूढे । कर्मसंबधन तयाकडे । केवीं लागे

vicharin pan dhadaphuden | deh tanv keval jadamudhe | karmasambadhan tayakade | kevin lage

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विचारीं पां धडफुडें । देह तंव केवळ जडमूढे । कर्मसंबधन तयाकडे । केवीं लागे ॥१॥ आत्मनीं न रिघे कर्म । कर्म केवळ श्रम । थिल्लरी जेवी सोम । चळी कांपे ॥२॥ देह जगत्व न लगे देहीं । अथवा न लगे आत्म्याच्या ठायीं । आतां कर्म तें मिथ्या पाहीं ॥३॥ भ्रमरुप वाढवितां कर्मठपण । ठकलें सज्ञान जन । एका जनार्दनीं कर्म भ्रमण । बोळवण रया ॥४॥