भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेणुनादीं लाभे काला । उणें त्याला मग काय

venunadin labhe kala | unen tyala mag kay

रचनाकार: संत निळोबा · अभंग
वेणुनादीं लाभे काला । उणें त्याला मग काय ॥१॥ ब्रम्हानंदे कोंदे सुष्टी । शीतचि ओंठी लागतां ॥२॥ देतां पदीं पिंडदाना । पितृगणा उध्दार ॥३॥ निळा म्हणे देवचि ऋणी । एक स्नानीं पधाळा ॥४॥