भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदोक्त पठण करितां चढे मान । तेणें होय पतन कर्मभूमी

vedokta pathan karitan chadhe man | tenen hoy patan karmabhumi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेदोक्त पठण करितां चढे मान । तेणें होय पतन कर्मभूमी ॥१॥ सोपें ते साधन संतांसी शरण । तेणें चुके बंधन जडजीवां ॥२॥ अभ्यासाचा सोस वाउगाची द्वेष । न करी सायास नाम जपे ॥३॥ एका जनार्दनीं सायासाचे भरी । नको पडुं फेरी चौर्‍याशींच्या ॥४॥