भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदादिक श्रमले न कळे जया पार । शस्त्रांसी निर्धार न कळेची

vedadik shramale na kale jaya par | shastransi nirdhar na kalechi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेदादिक श्रमले न कळे जया पार । शस्त्रांसी निर्धार न कळेची ॥१॥ तो हा श्रीहरी नंदाचिया घरीं । क्रीडे नानापरी गोपिकांसी ॥२॥ चोरावया निघे गोपिकांचें लोणी । सौगडें मिळोनी एकसरें ॥३॥ एका जनार्दनी खेळतसे खेळा । न कळे अकळ आगमनिगमां ॥४॥