भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेद शोधितां शिणले । मग ते मौनचि राहिलें

ved shodhitan shinale | mag te maunachi rahilen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
वेद शोधितां शिणले । मग ते मौनचि राहिलें ॥१॥ देखोनि निजात्मा निर्मळा । नेणती गोरा कीं सांवळा ॥२॥ हा हस्व दीर्घ नये माना । बाळावृध्द किंवा तरुणा ॥३॥ निळा म्हणे तो हा येथें । आला भेटों पुंडलिकातें ॥४॥