भजनी मालिका
← भजनांकडे परत

वायांविण करुं नये बोभाट । सांपडली वाट सरळ आम्हां

vayanvin karun naye bobhat | sampadali vat saral amhan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वायांविण करुं नये बोभाट । सांपडली वाट सरळ आम्हां ॥१॥ आतां नाहीं भय तत्त्वतां । ठेविला माथा चरणावरी ॥२॥ धरिल्या जन्माचें सार्थक । निवारला थोर धाक ॥३॥ गेला मागील तो शीण । तुमचें दरुशन होतांची ॥४॥ पूर्णपणें पूर्ण जाहलों । एका जनार्दनीं धालों ॥५॥