भजनी मालिका
← भजनांकडे परत

वायांची सोस संसार कामाचा । रामनामीं वाचा रंगी कां रे

vayanchi sos sansar kamacha | ramanamin vacha rangi kan re

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वायांची सोस संसार कामाचा । रामनामीं वाचा रंगी कां रे ॥१॥ यापरती जीवा सोडवण नाहीं । वेदशास्त्रीं पाहीं भाष्य असे ॥२॥ पुराणे डांगोरा पिटती नामाचा । तें तूं कां रे वाचा न वदसी ॥३॥ सायास साधनें न लगे आणीक । एका जनार्दनीं ऐक्य मन करी ॥४॥