भजनी मालिका
← भजनांकडे परत

वायांचि भुली पडली गव्हारा । भ्रमली भोंवरा संसारींच्या

vayanchi bhuli padali gavhara | bhramali bhonvara sansarinchya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वायांचि भुली पडली गव्हारा । भ्रमली भोंवरा संसारींच्या ॥१॥ कां रे सावध न होशी मूढा । शिणशी दगडा फजितखोरा ॥२॥ गुंतुनी पडसी वाउग्या व्यसनीं । संसार घसणीं चौर्‍यांयशींच्या ॥३॥ एका जनार्दनीं किती हें सांगावें । जाणत जाणत नागवे निलाजिरा ॥४॥