भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाऊगाची सोस करितोसी तूं मना । चिंती तुं चरणां विठोबाच्या

vaugachi sos karitosi tun mana | chinti tun charanan vithobachya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वाऊगाची सोस करितोसी तूं मना । चिंती तुं चरणां विठोबाच्या ॥१॥ अविनाश सुख देईल सर्वदा । वाचे वदा सदा रामनाम ॥२॥ तारिले पातकी पावन कलियुगी । नामनौका जगीं तारावया ॥३॥ भवसिंधु पार रामनाम सार । न करीं विचार दुजां कांहीं ॥४॥ एका जनार्दनीं घ्यावा अनुभव । प्रत्यक्ष पाहा देव विटेवरी ॥५॥