भजनी मालिका
← भजनांकडे परत

वत्साचिये लळे जैसी । धेनु अपैशी येत घरां

vatsachiye lale jaisi | dhenu apaishi yet gharan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वत्साचिये लळे जैसी । धेनु अपैशी येत घरां ॥१॥ तैसा भक्तांघरी नारायण । धांवे आपण वोढीनें ॥२॥ मुंगुयांच्या घरां मुळ । धांडी समुळ कोण तो ॥३॥ एका जनार्दनीं देव । घेत धांव आपणचि ॥४॥