भजनी मालिका
← भजनांकडे परत

वासना विषयीं सदा वसे । तेथें देवा कोण पुसे

vasana vishayin sada vase | tethen deva kon puse

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वासना विषयीं सदा वसे । तेथें देवा कोण पुसे ॥१॥ सदा तळमळी मन । करी ध्यान विषयांचें ॥२॥ रात्रंदिवस करी चिंता । नाठवी सर्वथा रामनाम ॥३॥ एका जनार्दनीं नाहीं भाव । तंव कैंचा भेटे देव ॥४॥