भजनी मालिका
← भजनांकडे परत

वारकरी पंढरीचा । धन्य धन्य जन्म त्याचा

varakari pandharicha | dhanya dhanya janma tyacha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वारकरी पंढरीचा । धन्य धन्य जन्म त्याचा ॥१॥ जाय नेमें पढंरीसी । चुको नेदी तो वारीसी ॥२॥ आषाढी कार्तिकी । सदां नाम गाय मुर्खीं ॥३॥ एका जनार्दनीं करी वारी । धन्य तोचि बा संसारीं ॥४॥