भजनी मालिका
← भजनांकडे परत

वांटुनियां गडी चेंडु मांडियेली फळी । मेलासी धांवतां कान्हो नाटोपेचि बळी

vantuniyan gadi chendu mandiyeli phali | melasi dhanvatan kanho natopechi bali

रचनाकार: संत निळोबा · अभंग
वांटुनियां गडी चेंडु मांडियेली फळी । मेलासी धांवतां कान्हो नाटोपेचि बळी ॥१॥ येईल चेंडू हातारे । हरिसी शरण जातां ॥२॥ पाडिल्या लगोया जेणें तेणेंचि नेला डावो । वाउगीची शीणती येरें धांवतां गेले पावो ॥३॥ निळा म्हणे शरण गोपाळा जांई करीं तातडी । तरीच चेंडु येईल हातां पांगविसी गडी ॥४॥