भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाणी वदे रामनाम । तेणें साधे सर्व काम

vani vade ramanam | tenen sadhe sarva kam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वाणी वदे रामनाम । तेणें साधे सर्व काम ॥१॥ मनें रामाचें चिंतन । नामीं चित्त समाधान ॥२॥ बुद्धिलागीं हाचि छंद । नित्य वदावा गोविंद ॥३॥ गोविंदावांचुनी । दुजा ध्यास नाहीं मनीं ॥४॥ एका जनार्दनीं मन । नित्य करी ब्रह्माध्यान ॥५॥