भजनी मालिका
← भजनांकडे परत

वंदें तूं अच्युत सर्वकाळ सदा । मायापाश बंध तुटोनि जाय

vanden tun achyut sarvakal sada | mayapash bandh tutoni jay

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वंदें तूं अच्युत सर्वकाळ सदा । मायापाश बंध तुटोनि जाय ॥१॥ करी कां रे नेम धरीं का रे प्रेम । अच्युताचें नाम वंदे सदा ॥२॥ जनार्दनाचा एका अच्युत पै झाला । सप्रेमे रंगला प्रेमें रंगीं ॥३॥