भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैराग्य प्रथम असावी शांती । तेणें विरक्ति अंगीं जोडे

vairagya pratham asavi shanti | tenen virakti angin jode

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वैराग्य प्रथम असावी शांती । तेणें विरक्ति अंगीं जोडे ॥१॥ हेंचि मुर्ख वर्म साधतां साधन । येणें जनार्दन जवळी असे ॥२॥ उपासना मार्ग हेंचि कर्मकांड । हेंचिक जें ब्रह्मांड जनीं वनीं ॥३॥ हेचि देहस्थिति विदेह समाधी । तुटती उपाधी कर्माकर्म ॥४॥ एका जनार्दनीं शांति क्षमा दया । यांविण उपाय उपाधी ते ॥५॥