भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैराग्य करा कथा । सांडुन डंबिक तया

vairagya kara katha | sandun dambik taya

रचनाकार: संत महंमद · अभंग
वैराग्य करा कथा । सांडुन डंबिक तया । स श्रोत्याचि बथा । हरेल तेणे ॥१॥ प्रेमे नेघे नाम गोडि । शब्द संस्कारें बडबडि न । होउनिया मोडि । या डोळ्यातें ॥ २ ॥ डोळे माळेखोवे लाजे । पाहाति विषयांचे राजे । तों तो कल्पना माजे । वासने संगे ॥३॥ मन दाहिवाटा । भरे चेतनेचा ताठा । ऐसा व्यापार हा खोटा हरिकथेमधी ॥४॥ सेख महमद मुसलमान । बोले हरि जोडेसि तुम्ही मांडुनियां । अवगुण प्रेमें कथा करा ॥५॥