भजनी मालिका
← भजनांकडे परत

वदे तोचि कल्पित शास्त्र तें शाब्दिक । पुराणा सकळिक बाष्कळचि

vade tochi kalpit shastra ten shabdik | purana sakalik bashkalachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वदे तोचि कल्पित शास्त्र तें शाब्दिक । पुराणा सकळिक बाष्कळचि ॥१॥ बाहुली तो जीव सुत्रधारी तो शिव । मिथ्याचि हे भाव जग सर्व ॥२॥ येथें कैंचा मुक्त मुळींच नाहीं बद्ध । सर्वहि अबद्ध दिसे जें कां ॥३॥ एका जनार्दनीं ऐसी याची खूण । जाणें तोचि धन्य गुरुपुत्र ॥४॥