भजनी मालिका
← भजनांकडे परत

वादविवाद अतिवाद । नावडे कोणाचीही संमध

vadavivad ativad | navade konachihi sammadh

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वादविवाद अतिवाद । नावडे कोणाचीही संमध ॥१॥ बोल एक आम्हां बोलणें । वाचे विठ्ठलुचि म्हणे ॥२॥ आणिकाची चाड चित्तीं । नाहीं नाहीं गा त्रिजगतीं ॥३॥ शरण एका जनार्दनीं । विठ्ठल भरलासे व्यापुनी ॥४॥