भजनी मालिका
← भजनांकडे परत

वदतां वदनीं अहर्निशीं राम । उपदेश सुगम सोपा मंत्र

vadatan vadanin aharnishin ram | upadesh sugam sopa mantra

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वदतां वदनीं अहर्निशीं राम । उपदेश सुगम सोपा मंत्र ॥१॥ दो अक्षरीं राम तेणें जोडे धाम । आणिक तो श्रम वायां जाये ॥२॥ सर्वाभूति समदृष्टिते पहाणें । मग नाहीं पेणें आन दुजें ॥३॥ दुजें पेनें नाहीं एका जनार्दनीं । श्रीरामावाचुनीं आन नेणें ॥४॥