भजनी मालिका
← भजनांकडे परत

वदन सुहास्य रसाळ हा राघव

vadan suhasya rasal ha raghav

रचनाकार: संत रामदास · अभंग
वदन सुहास्य रसाळ हा राघव । सर्वांगी तनु सुनीळ हा राघव मृगनाभी रेखिला टिळा हा राघव। मस्तकीं सुमनमाळा हा राघव साजिरी वैजयंती हा राघव । पायीं तोडर गर्जती हा राघव सुंदर लावण्यखाणी हा राघव । उभा कोदंडपाणी हा राघव सकल जीवांचें जीवन हा राघव। रामदासासि प्रसन्नहा राघव ।