भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाचे विठ्ठल बोलावें । मग पाऊल ठाकावें

vache viththal bolaven | mag paul thakaven

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वाचे विठ्ठल बोलावें । मग पाऊल ठाकावें ॥१॥ ऐसा ज्याचा नेमधर्म । मुखीं विठ्ठलाचें नाम ॥२॥ सर्वकाळ वाचें । विठ्ठलनाम वदती साचें ॥३॥ कुळधर्म आमुचा । म्हणे एका जनार्दनाचा ॥४॥