भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाचे उच्चारिलें नाम । ह्रदयीं धरुनियां प्रेम

vache uchcharilen nam | hradayin dharuniyan prem

रचनाकार: संत निळोबा · अभंग
वाचे उच्चारिलें नाम । ह्रदयीं धरुनियां प्रेम ॥१॥ तेंचि बीज फळा आलें । रुप दृष्टीगोचर झालें ॥२॥ कळासलें ध्यानीं मनीं । दिसे तेंचि जनीं वनीं ॥३॥ निळा म्हणे पंढरीनाथ । अंतरबाह्य जेथें तेथें ॥४॥