भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाचे उच्चारी जो ज्ञानदेवाशी । तयाच्या सुकृतासी नाहीं पार

vache uchchari jo dnyanadevashi | tayachya sukrutasi nahin par

रचनाकार: संत सेना · अभंग
वाचे उच्चारी जो ज्ञानदेवाशी । तयाच्या सुकृतासी नाहीं पार ॥१॥ पूर्वीचे सुकृत फळासि आलें। वाचें उच्चारिलें ज्ञानदेवा ॥२॥ या अलंकापुरीं आला जन्मांसि । पूर्वज तयासी मानिती धन्य ॥३॥ सेना म्हणे त्यानें उद्धरिलें कुळ। पूर्वज सकळ आशिर्वाद देती॥४॥