भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाचे म्हणा रामनाम । तेणें निवारे क्रोध काम । संसाराचा श्रम । नुरे कांहीं तिळमात्र

vache mhana ramanam | tenen nivare krodh kam | sansaracha shram | nure kanhin tilamatra

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वाचे म्हणा रामनाम । तेणें निवारे क्रोध काम । संसाराचा श्रम । नुरे कांहीं तिळमात्र ॥१॥ न लगे वेदविधि आचार । सोपा मंत्राचा उच्चार । अबद्ध अथवा शुचि साचार । राम म्हणा सादर ॥२॥ एका जनार्दनीं धरूनी भाव । वाचे वदा रामराव । भवसिंधूचें भेव नुरे तुम्हां कल्पातीं ॥३॥