भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाचे बोलविलें देवें । मज हें काय होतें ठावें

vache bolavilen deven | maj hen kay hoten thaven

रचनाकार: संत निळोबा · अभंग
वाचे बोलविलें देवें । मज हें काय होतें ठावें ॥१॥ सहज नामें आळवितां । ओघ आला हा अवचिता ॥२॥ संत जाणती अंतर । कीं हा रखुमाईचा वर ॥३॥ निळा म्हणे पुसिलि गोठी । नये सांगतां तें गोमटी ॥४॥