भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाचा नामसंकीर्तनीं । मानस तुमच्या निश्चयें ध्यानी । नेत्र हे तुमच्या अवलोकनीं । चालावें चरणीं तीर्थयात्रे

vacha namasankirtanin | manas tumachya nishchayen dhyani | netra he tumachya avalokanin | chalaven charanin tirthayatre

रचनाकार: संत निळोबा · अभंग
वाचा नामसंकीर्तनीं । मानस तुमच्या निश्चयें ध्यानी । नेत्र हे तुमच्या अवलोकनीं । चालावें चरणीं तीर्थयात्रे ॥१॥ करीं करावें तुमचें पूजन । श्रवणीं करावें गुणांचे श्रवण । चित्तें सदां तुमचें चिंतन । घ्राणी अवघ्राण निर्माल्य तुळसी ॥२॥ बुध्दीसी तुमची बोधकता । जीवीं तुमचीं राहो आस्था । तुमचे चरणीं निश्चळ माथा । अखंडता अखंड ॥३॥ सकळ इंद्रियां तुमची प्राप्ती । भगव्दावना राहो भूतीं । व्देषाव्देष तो नुमटो चित्तीं । दयावें श्रीपतीं हें दान ॥४॥ कांमक्रोधाचें न व्हावें दर्शन । नका आशेतृष्णेचें बंधन । ठेवा आपुल्या पायीं जीवन । दयावें समाधान सर्वदा मना ॥५॥ कीर्तन नित्यकाळ देवा तुझें । उतरीं मी हें माझें ओझें । आपुल्या गुणीं नाचवी भोजें । जिव्हा नामीं रंगों दया ॥६॥ निळा म्हणे कृपानिधी । माझी मोडावी व्दैतबुध्दि । अवघी तोडुनिया उपाधी । स्थापा निजपदीं शरणांगता ॥७॥