भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाचा लोधावली गुणा

vacha lodhavali guna

रचनाकार: संत जोगा · अभंग
“वाचा लोधावली गुणा। स्वरुपी पाहिले लोचना॥ चरणी स्थिरावले मन। जगजीवन देखिलिया॥ तो म्या देखिला देखिला। विठ्ठल पंढरीचा राजा ॥ भानुबिंबे अति सुढाळ। मन मंडित वःक्षस्थळा ॥ चरणी तेजाचे झळाळ। मुगुटी किरणे फाकती ॥ ऐसा नयनी देखिला। तो मज असुमाई झाला॥ जोगा विनवितो विठ्ठला।वोसंडला आनंदु॥”