भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन निवाले निवाले । कैसें समाधान झालें

man nivale nivale | kaisen samadhan jhalen

रचनाकार: संत जोगा · अभंग
मन निवाले निवाले । कैसें समाधान झालें ॥ संतं आलिया अवसरी । नवल आरती यांची परी ॥ आनंदे नर नारी । परमानंद प्रकटले ॥ द्यावया आलिंगन । बाह्यां येतसे स्फुरण ॥ सजळ झाले लोचन । जैसे मेघ वर्षती ॥ आजि सुदिन सोहळा । संत जीवनाची कळा ॥ जोगा विनवितो सकळा । भेटी परमानंदेस्त ॥