भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाचा गुणीं लांचावली । मति विस्तारें फांकली

vacha gunin lanchavali | mati vistaren phankali

रचनाकार: संत निळोबा · अभंग
वाचा गुणीं लांचावली । मति विस्तारें फांकली ॥१॥ ऐशी केली तुम्ही दया । कृपाळूवा पंढरीराया ॥२॥ सर्वकाळ ध्यानीं मनीं । रुप राहिलें चिंतनीं ॥३॥ निळा म्हणे भूक तहान । गेली ठायीचि हरपोन ॥४॥