भजनी मालिका
← भजनांकडे परत

उत्तम साधन रामनाम जाण । यापरतें निधान आणिक नाहीं

uttam sadhan ramanam jan | yaparaten nidhan anik nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उत्तम साधन रामनाम जाण । यापरतें निधान आणिक नाहीं ॥१॥ नलगे समाधि रामनाम घेतां । उघडा जप तत्त्वतां सूपा राम ॥२॥ नलगे विरक्ति नाम मंत्र तंत्र । रामनाम पवित्र जप सोपा ॥३॥ एका जनार्दनीं सोपें रामनाम ध्यान । पवित्र पावन रामनाम ॥४॥