भजनी मालिका
← भजनांकडे परत

उत्तम मध्यम कनिष्ठ यांचें नाहीं काम । जपावें तें नाम आधीं आधीं

uttam madhyam kanishtha yanchen nahin kam | japaven ten nam adhin adhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उत्तम मध्यम कनिष्ठ यांचें नाहीं काम । जपावें तें नाम आधीं आधीं ॥१॥ वर्णाश्रम धर्म याचें नाहीं काम । जपावें तें नाम आधीं आधीं ॥२॥ रज तम सत्व यांचें नाहीं काम । जपावें तें नाम आधीं आधीं ॥३॥ एका जनार्दनीं हें परतें सारा । जपा रघुवीरा एका भावें ॥४॥