भजनी मालिका
← भजनांकडे परत

उत्तम अथवा चांडाळ । न पाहेचि खळाखळ

uttam athava chandal | na pahechi khalakhal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उत्तम अथवा चांडाळ । न पाहेचि खळाखळ ॥१॥ शरण आलिया तत्त्वतां । तया नुपेक्षी सर्वथा ॥२॥ न म्हणे शुचि अथवा चांडाळ । स्मरणेंचि मुक्तिफळ ॥३॥ ऐसा पतीत पावन । शरण एका जनार्दन ॥४॥