भजनी मालिका
← भजनांकडे परत

उतरिला धराभार । जेणें घेऊनियां अवतार

utarila dharabhar | jenen gheuniyan avatar

रचनाकार: संत निळोबा · अभंग
उतरिला धराभार । जेणें घेऊनियां अवतार ॥१॥ तो हा भक्तें पुंडलिकें । गोंवियेला घेउनी भाकें ॥२॥ शिळीं बांधिला सागर । निर्दाळिला दशशीर ॥३॥ निळा म्हणे नारी । सोडवूनि राज्य करी ॥४॥