भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपवास पारणें न लागे समाधी । वायांचि उपाधि कोण धरी

upavas paranen na lage samadhi | vayanchi upadhi kon dhari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उपवास पारणें न लागे समाधी । वायांचि उपाधि कोण धरी ॥१॥ आम्हां विष्णुदासा कळलेंसे वर्म । मुखीं गावें नाम हातीं टाळीं ॥२॥ आनंदें बागडे जाती पंढरीसी । पहाती विठोबासी दृष्टीभरी ॥३॥ एका जनार्दनीं मनाचें उन्मन । एका दरुशनें मुक्तिपद ॥४॥