भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपवास पारणें न लगे । आणिक साधन । नामापरतें निधान नाहीं जगीं

upavas paranen na lage | anik sadhan | namaparaten nidhan nahin jagin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उपवास पारणें न लगे । आणिक साधन । नामापरतें निधान नाहीं जगीं ॥१॥ म्हणोनि सांडी सांडी काम परतें । वाचेसी आरुतें नाम जपें ॥२॥ नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनीं । नाम हें निर्वाणीं तारक जगा ॥३॥ एका जनार्दनीं नाम श्रेष्ठाचें श्रेष्ठ । सर्वांही वरिष्ठ नाम एक ॥४॥