भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपवास पडिले भारी । ती वेदना जाणे हरी

upavas padile bhari | ti vedana jane hari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उपवास पडिले भारी । ती वेदना जाणे हरी ॥१॥ मज जाली नाहीं बाधा । देहीं देखतां गोविंदा ॥२॥ देहींचें दुःख अथवा सुख । भेटों नयेचि सन्मुख ॥३॥ एका जनार्दनीं सुख । विसरला तहान भुक ॥४॥