भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपासना धरुनी जीवीं । आलों गांवीं विठोबाच्या

upasana dharuni jivin | alon ganvin vithobachya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उपासना धरुनी जीवीं । आलों गांवीं विठोबाच्या ॥१॥ उभयतांच्या दरुशनें । जाहलें पारणें जीवशिवा ॥२॥ कष्टलों होतों दाहीं दिशा । पाहतां अशा निमाली ॥३॥ केला परिहार श्रम । उरला नाहीं भवभ्रम ॥४॥ जडलें सदा पायीं मन । आतां न करीं साधन ॥५॥ जाहलों जीवें भावें दास । एका जनार्दनीं पुरली आस ॥६॥