भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपरम झाला सर्वकाळ इंद्रियां । स्वरुपीं विलया मन गेलें

uparam jhala sarvakal indriyan | svarupin vilaya man gelen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
उपरम झाला सर्वकाळ इंद्रियां । स्वरुपीं विलया मन गेलें ॥१॥ ऐशिया स्वानंदे बुझाविलें चित्त । राहिली अचिंत वदनीं वाचा ॥२॥ अष्ट अविर्भाव डवरले अंगीं । प्राणी प्राणरंगीं निजवासें ॥३॥ त्रयबंध ठसा पडिला शरीरा । वृत्ति गेली घरा निजाचिया ॥४॥ निमोनियां गेलें शब्दाचें बोलणें । पवनचि प्राणें शोषियेला ॥५॥ निळा सुखासुखीं पावला विश्रांती । पद पिंडा समाप्ति करुनियां ॥६॥