भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपमन्यु सान देवासी कळवळ । क्षीरसिंधु तात्काळ दिला त्यासी

upamanyu san devasi kalaval | kshirasindhu tatkal dila tyasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उपमन्यु सान देवासी कळवळ । क्षीरसिंधु तात्काळ दिला त्यासी ॥१॥ सानपणें अर्जुनें साधियेलें काज । श्रीकृष्ण निजगूज सांगतसे ॥२॥ सानपणें उद्धव झालासे विमुक्त । सानप्णें तो निश्चित तारियेला ॥३॥ सानपणें सुख गोपाळ गौळणी । एका जनार्दनीं सदोदित ॥४॥