भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपाधीच्या नांवें घातियेलें शून्य । आणिका दैन्यवाणें काय बोलुं

upadhichya nanven ghatiyelen shunya | anika dainyavanen kay bolun

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उपाधीच्या नांवें घातियेलें शून्य । आणिका दैन्यवाणें काय बोलुं ॥१॥ टाकूनिइयां संग धरियेला देव । आतां तो उपाय दुजा नाहीं ॥२॥ सर्व वैभव सत्ता जयाचें पदरीं । जालों अधिकारी आम्हीं बळें ॥३॥ एका जनादनीं तोडियेला संग । जालों आम्हीं निःसंग हरिभजनीं ॥४॥