भजनी मालिका
← भजनांकडे परत

उलट भावना पालट मनाची । कायावाचा देहाची स्थिती एक

ulat bhavana palat manachi | kayavacha dehachi sthiti ek

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उलट भावना पालट मनाची । कायावाचा देहाची स्थिती एक ॥१॥ होणार तें होय देहाचें पतन । तेथें कोणा कमीपण येतें जातें ॥२॥ आणिलें जयाचें तें देणेंचि आहे । सोस वाउगा वाहे काय फळ ॥३॥ एका जनार्दनीं वाउगा पसारा । व्यर्थ हांवभर प्राणी जाहले ॥४॥