भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदंड तीर्थें क्षेत्रें पाहातां दिठीं । नाहीं सृष्टी तारक

udand tirthen kshetren pahatan dithin | nahin srushti tarak

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उदंड तीर्थें क्षेत्रें पाहातां दिठीं । नाहीं सृष्टी तारक ॥१॥ स्नानें पावती मुक्ति जगा । ऐशी चंद्रभागा समर्थ ॥२॥ पुडलिका नमस्कार । सकळ पूर्वजां उद्धार ॥३॥ पाहतां राउळाची ध्वजा । मुक्ती सहजा राबती ॥४॥ एका जनार्दनीं विठ्ठल भेटी । मग लाभा नये तुटी ॥५॥