भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदकी साखर पडत । विरोनी उदका गोड करीत

udaki sakhar padat | vironi udaka god karit

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उदकी साखर पडत । विरोनी उदका गोड करीत ॥१॥ तेथें हेतुसी नाहीं ठावो । निमाला भाव आणी अभावो ॥२॥ सांडोनी मोपणासी । खेंव दिधला समरसी ॥३॥ एका जनार्दनीं शरण । एकपणें एकचि जाण ॥४॥