भजनी मालिका
← भजनांकडे परत

उचित अनुचित आमुचे भागासी

uchit anuchit amuche bhagasi

उचित अनुचित आमुचे भागासी । आलें ह्रषीकेशी वाटतसे ॥१॥ तुम्हांसी विसर पडियेलासे माझा । हें तंव केशीराजा कळलें मज ॥२॥ नागवें उघडें वागविलें खांदीं । म्हणोनी उपाधी सांडियेली ॥३॥ कर्ममेळा म्हणे नाम हें चांगलें । गोडा गोडावलें गोडपणें ॥४॥